PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.8.1

पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.
 
Paṇa dēva nōhālā visaralā nāhī; tyānē nōhācī va tyācyā sōbata tāravāta asalēlyā sarva prāṇyān̄cī āṭhavaṇa kēlī; dēvānē pr̥thvīvara vārā vāhavalā. Āṇi pāṇī disēnāsē hō'ū lāgalē.

उत्पत्ति 8
उत्पत्ति 8:1-5

The Ark Rests on Ararat

1 पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.
 
Paṇa dēva nōhālā visaralā nāhī; tyānē nōhācī va tyācyā sōbata tāravāta asalēlyā sarva prāṇyān̄cī āṭhavaṇa kēlī; dēvānē pr̥thvīvara vārā vāhavalā. Āṇi pāṇī disēnāsē hō'ū lāgalē.
2 आकाशातून मुसळधार पडणारा पाऊस थांबला; आणि पृथ्वीच्या पोटातून उफाळून वर येणारे सर्व झऱ्यांचे पाणी वाहाण्याचे थांबले,
 
Ākāśātūna musaḷadhāra paḍaṇārā pā'ūsa thāmbalā; āṇi pr̥thvīcyā pōṭātūna uphāḷūna vara yēṇārē sarva jhaṟyān̄cē pāṇī vāhāṇyācē thāmbalē,
3 [This verse may not be a part of this translation]
4 [This verse may not be a part of this translation]
5 सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारु आरारात पर्वताजवळ थांबून पुन्हा जमिनीवर टेकले; पाणी सतत ओसरत राहिले आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताची शिखरे दिसू लागली.
 
Sātavyā mahin'yācyā satarāvyā divaśī tāru ārārāta parvatājavaḷa thāmbūna punhā jaminīvara ṭēkalē; pāṇī satata ōsarata rāhilē āṇi dahāvyā mahin'yācyā pahilyā divaśī parvatācī śikharē disū lāgalī.

Noah Sends a Raven and a Dove

6 चाळीस दिवसांनंतर नोहाने तयार केलेली तारवाची खिडकी उघडली
 
Cāḷīsa divasānnantara nōhānē tayāra kēlēlī tāravācī khiḍakī ughaḍalī
7 आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पाणी संपून जमीन कोरडी होईपर्यंत इकडे-तिकडे उडत राहिला.
 
Āṇi ēka kāvaḷā bāhēra sōḍalā; tō pāṇī sampūna jamīna kōraḍī hō'īparyanta ikaḍē-tikaḍē uḍata rāhilā.
8 जमिनीच्या पृष्टभागावरुन पाणी उतरले आहे का नाही हे जाणून घेण्याकरिता नोहाने एका कबुतरालाही बाहेर सोडले.
 
Jaminīcyā pr̥ṣṭabhāgāvaruna pāṇī utaralē āhē kā nāhī hē jāṇūna ghēṇyākaritā nōhānē ēkā kabutarālāhī bāhēra sōḍalē.
9 जमीन अजून पाण्याने झाकलेली असल्यामुळे कबुतराला टेकायला जागा मिळाली नाही. म्हणून ते तारवाकडे परत आले तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरले व तारवाच्या आत घेतले.
 
Jamīna ajūna pāṇyānē jhākalēlī asalyāmuḷē kabutarālā ṭēkāyalā jāgā miḷālī nāhī. Mhaṇūna tē tāravākaḍē parata ālē tēvhā nōhānē hāta bāhēra kāḍhūna tyālā dharalē va tāravācyā āta ghētalē.
10 सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले;
 
Sāta divasānantara nōhānē punhā kabutarālā bāhēra sōḍalē;
11 तेव्हा ते दुपारी नोहाकडे परत आले तेव्हा त्याच्या चोचींत आँलीव्ह वृक्षाचे (म्हणजे जैतून झाडाचे) कोवळे पान होते. यावरुन जमीन सुकली असल्याचे नोहाला समजले,
 
Tēvhā tē dupārī nōhākaḍē parata ālē tēvhā tyācyā cōcīnta ām̐līvha vr̥kṣācē (mhaṇajē jaitūna jhāḍācē) kōvaḷē pāna hōtē. Yāvaruna jamīna sukalī asalyācē nōhālā samajalē,
12 आणखी सात दिवसांनी नोहाने कबुतराला पुन्हा बाहेर सोडले परंतु यावेळी मात्र ते परत आले नाही.
 
Āṇakhī sāta divasānnī nōhānē kabutarālā punhā bāhēra sōḍalē parantu yāvēḷī mātra tē parata ālē nāhī.

Exiting the Ark

13 त्यानंतर नोहाने तारवाचे दार उघडले. जमीन सुकून गेली आहे असे होता नोहाला दिसले. हा वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस होता. नोहा तेव्हा 601 वर्षांचा होता.
 
Tyānantara nōhānē tāravācē dāra ughaḍalē. Jamīna sukūna gēlī āhē asē hōtā nōhālā disalē. Hā varṣācyā pahilyā mahin'yācā pahilā divasa hōtā. Nōhā tēvhā 601 varṣān̄cā hōtā.
14 दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत जमीन खडखडीत कोरडी झाली होती.
 
Dusaṟyā mahin'yācyā sattāvisāvyā divasāparyanta jamīna khaḍakhaḍīta kōraḍī jhālī hōtī.
15 नंतर देव नोहाला म्हणाला,
 
Nantara dēva nōhālā mhaṇālā,
16 “तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ;
17 तुझ्या बरोबर सर्वपक्षी, पशू जमिनीवर रांगणारे प्राणी या सर्वांना तारवातून बाहेर आण; ते प्राणी आपापल्या जातीची भरपूर संतती उत्पन्न करतील व पुन्हा पृथ्वी भरुन टाकतील.”
 
Tujhyā barōbara sarvapakṣī, paśū jaminīvara rāṅgaṇārē prāṇī yā sarvānnā tāravātūna bāhēra āṇa; tē prāṇī āpāpalyā jātīcī bharapūra santatī utpanna karatīla va punhā pr̥thvī bharuna ṭākatīla.”
18 तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला;
 
Tēvhā nōhā āpalē putra, bāyakō va sunā yānnā ghē'ūna tāravātūna bāhēra nighālā;
19 त्याच्या बरोबरचे सर्व पशू, रांगणारे प्राणी व पक्षी जातवारीने जोडीजोडीने तारवातून बाहेर निघाले.
 
Tyācyā barōbaracē sarva paśū, rāṅgaṇārē prāṇī va pakṣī jātavārīnē jōḍījōḍīnē tāravātūna bāhēra nighālē.

Noah Builds an Altar

20 त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशू यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले.
 
Tyānantara nōhānē paramēśvarākaritā ēka vēdī bāndhalī āṇi dēvānē agōdara sāṅgitalyāpramāṇē sarva śud'dha pakṣī va sarva śud'dha paśū yāntūna kāhī arpaṇāsāṭhī ghētalē āṇi tyānē dēvāsāṭhī dēṇagī mhaṇūna tyān̄cē vēdīvara hōmārpaṇa kēlē.
21 परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वत:स म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा;
 
Paramēśvarānē tyā arpaṇācā suvāsa ghētalā āṇi tyānē tyālā ānanda jhālā; paramēśvara svata:Sa mhaṇālā, “mānavāsa śikṣā karaṇyākaritā mī punhā kadhīhī bhūmilā asā śāpa dēṇāra nāhī; āpalyā lahānapaṇāpāsūnaca mānava duṣṭa āhē; tēvhā yēthūna puḍhē kadhīhī mī pr̥thvīvaruna sarvasajīva sr̥ṣṭīcā nāśa karaṇāra nāhī punhā;
22 जोपर्यंत पृथ्वी राहील तो पर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र व्हावयाची थांबणार नाहींत.”
 
Jōparyanta pr̥thvī rāhīla tō paryanta pēraṇī va kāpaṇī, thaṇḍī va ūna, hivāḷā va unhāḷā, divasa va rātra vhāvayācī thāmbaṇāra nāhīnta.”

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.