PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.5.1

आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
 
Ādāmācyā vanśāvaḷīcī nōnda aśī āhē. Dēvānē manuṣya āpalyā pratirupācā mhaṇajē āpalyā sārakhā nirmāṇa kēlā.

उत्पत्ति 5
उत्पत्ति 5:1-17

The Descendants of Adam

1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला.
 
Ādāmācyā vanśāvaḷīcī nōnda aśī āhē. Dēvānē manuṣya āpalyā pratirupācā mhaṇajē āpalyā sārakhā nirmāṇa kēlā.
2 देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
 
Dēvānē tyānsa nara va nārī asē utpanna kēlē. Dēvānē tyānsa jyā divaśī utpanna kēlē tyāca divaśī dēvānē tyānsa āśīrvāda dilā va tyānsa “ādāma” mhaṇajē manuṣya hē nāva dilē.
3 आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
 
Ādāma ēkaśētīsa varṣān̄cā jhālyāvara tyālā tyācyā pratirupācā mhaṇajē hubēhūba tyācyā sārakhā disaṇārā mulagā jhālā. Tyānē tyācē nāva śētha ṭhēvalē;
4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
 
Śētha janmalyānantara ādāma āṭhaśēṁ varṣē jagalā āṇi yā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā.
5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
 
Aśā rītīnē ādāma ēkandara na'ūśētīsa varṣē jagalā; nantara tō maraṇa pāvalā.
6 शेथ एकशेंपाच वर्षांचा झाल्यावर त्याला अनोश नांवाचा मुलगा झाला.
 
Śētha ēkaśēmpāca varṣān̄cā jhālyāvara tyālā anōśa nānvācā mulagā jhālā.
7 अनोशच्या जन्मानंतर शेथ आठशेंसात वर्षे जगला, त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Anōśacyā janmānantara śētha āṭhaśēnsāta varṣē jagalā, tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
 
Śētha ēkandara na'ūśēmbārā varṣē jagalā, maga tō maraṇa pāvalā.
9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्याला केनान नावाचा मुलगा झाला;
 
Anōśa navvada varṣān̄cā jhālyāvara tyālā kēnāna nāvācā mulagā jhālā;
10 केनान जन्मल्यानंतर अनोश आठशेंपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Kēnāna janmalyānantara anōśa āṭhaśēmpandharā varṣē jagalā; tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
11 अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
 
Anōśa ēkandara na'ūśēmpāca varṣē jagalā; tyānantara tō maraṇa pāvalā.
12 केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला महललेल नावाचा मुलगा झाला;
 
Kēnāna sattara varṣān̄cā jhālyāvara tyālā mahalalēla nāvācā mulagā jhālā;
13 महललेल झाल्यावर केनान आठशेंचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Mahalalēla jhālyāvara kēnāna āṭhaśēn̄cāḷīsa varṣē jagalā; tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
14 केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
 
Kēnāna ēkandara na'ūśēndahā varṣē jagalā; nantara tō maraṇa pāvalā.
15 महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला यारेद नावाचा मुलगा झाला;
 
Mahalalēla pāsaṣṭa varṣān̄cā jhālyāvara tyālā yārēda nāvācā mulagā jhālā;
16 यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेंतीस वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Yārēda janmalyānantara mahalalēla āṭhaśēntīsa varṣē jagalā; tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
17 महललेल एकंदर आठशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
 
Mahalalēla ēkandara āṭhaśēṁ pan̄cyāṇṇava varṣē jagalā; tyānantara tō maraṇa pāvalā.

God Takes Up Enoch

18 यारेद एकशें बासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास हनोख नावाचा मुलगा झाला;
 
Yārēda ēkaśēṁ bāsaṣṭa varṣān̄cā jhālyāvara tyāsa hanōkha nāvācā mulagā jhālā;
19 हनोख झाल्यावर यारेद आठशें वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Hanōkha jhālyāvara yārēda āṭhaśēṁ varṣē jagalā; tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
20 यारेद एकंदर नऊशे बासष्ट वर्षे जगला; त्या नंतर तो मरण पावला.
 
Yārēda ēkandara na'ūśē bāsaṣṭa varṣē jagalā; tyā nantara tō maraṇa pāvalā.
21 हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्याला मथुशलह झाला;
 
Hanōkha pāsaṣṭa varṣān̄cā jhālyāvara tyālā mathuśalaha jhālā;
22 मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशें वर्षे देवाबरोबर चालला व त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Mathuśalaha janmalyāvara hanōkha tīnaśēṁ varṣē dēvābarōbara cālalā va tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
23 हनोख एकंदर तीनशें पासष्ट वर्षे जगला;
 
Hanōkha ēkandara tīnaśēṁ pāsaṣṭa varṣē jagalā;
24 एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
 
Ēkē divaśī hanōkha dēvābarōbara cālata hōtā; nantara tō nāhisā jhālā kāraṇa dēvānē tyālā nēlē.

From Methuselah to Noah

25 मथुशलह एकशे सत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला लामेख नावांचा मुलगा झाला;
 
Mathuśalaha ēkaśē satyā'ainśī varṣān̄cā jhālyāvara tyālā lāmēkha nāvān̄cā mulagā jhālā;
26 लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशेंब्याऐंशी वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Lāmēkhācyā janmānantara mathuśalaha sātaśēmbyā'ainśī varṣē jagalā; tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
27 मथुशलह एकंदर नऊशें एकुणसत्तर वर्षे जगला; त्यानांतर तो मरण पावला.
 
Mathuśalaha ēkandara na'ūśēṁ ēkuṇasattara varṣē jagalā; tyānāntara tō maraṇa pāvalā.
28 लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
 
Lāmēkha ēkaśēṁ byā'ainśī varṣān̄cā jhālyāvara tyālā ēka mulagā jhālā;
29 त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”
 
Tyānē tyācē nāva nōhā (mhaṇajē visāvā) asē ṭhēvalē. Lāmēkha mhāṇālā, “dēvānē bhūmilā śāpa dilyāmuḷē āpalyālā śētakarī mhaṇūna khūpa kāṣṭa karāvē lāgatāta; parantu nōhā āpalyālā visāvā dē'īla.”
30 नोहा झाल्यावर लामेख पाचशें पंच्याण्णव वर्षे जगला; त्या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या;
 
Nōhā jhālyāvara lāmēkha pācaśēṁ pan̄cyāṇṇava varṣē jagalā; tyā kāḷāta tyālā āṇakhī mulagē va mulī jhālyā;
31 लामेख एकंदर सातशें सत्याहत्तर वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
 
Lāmēkha ēkandara sātaśēṁ satyāhattara varṣē jagalā; nantara tō maraṇa pāvalā.
32 नोहा पाचशें वर्षांचा झाल्यावर त्याला शेम, हाम व याफेथ नावाचे मुलगे झाले.
 
Nōhā pācaśēṁ varṣān̄cā jhālyāvara tyālā śēma, hāma va yāphētha nāvācē mulagē jhālē.

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.