PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.2.1

याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले.
 
Yāpramāṇē pr̥thvī, ākāśa āṇi tyāntīla sarvakāhī pūrṇa karuna jhālē.

उत्पत्ति 2
उत्पत्ति 2:1-3

The Seventh Day—God Rest

The Seventh Day—God Rest
1 याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले.
 
Yāpramāṇē pr̥thvī, ākāśa āṇi tyāntīla sarvakāhī pūrṇa karuna jhālē.
2 देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला.
 
Dēvānē āpaṇa karīta asalēlē kāma sampavalē mhaṇūna sātavyā divaśī tyānē kāma karaṇyāpāsūna visāvā ghētalā.
3 देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.
 
Dēvānē sātavā divasa āśīrvāda dē'ūna pavitra kēlā va viśēṣa ṭharavilā kāraṇa tyā divaśī jaga nirmāṇa karatānā tyānē kēlēlyā sarva kāmāpāsūna visāvā ghētalā.

Man and Woman in the Garden

The First Man - Adam
4 हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे.
 
Hā ākāśa va pr̥thvī nirmāṇa kēlyācā itihāsa āhē. Dēvānē ākāśa va pr̥thvī utpanna kēlī tyā vēḷī jē jē ghaḍalē tyān̄cyā utpatti kramāviṣayīcā hā vr̥ttānta āhē.
5 त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
 
Tyāpūrvī pr̥thvīvara vanaspatī navhatī, śētāta kāhī ugavalē navhatē. Kāraṇa paramēśvarānē adyāpa pr̥thvīvara pā'ūsa pāḍalā navhatā āṇi jaminīcī maśāgata karaṇyāsa kōṇī manuṣya navhatā.
6 पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे.
 
Pr̥thvīvaruna dhukē vara jāta asē va tyānē sarva jaminīvara pāṇī śipaṇḍalē va pasaralē jāta asē.
7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.
 
Nantara paramēśvara dēvānē jāminītīla mātīcā manuṣya ghaḍavalā va tyācyā nākapuḍyāta jīvanācā śvāsa phuṅkalā āṇi manuṣya jīvadhārī mhaṇajē jīvanta prāṇī jhālā.
God’s Garden - Tree of Life & Knowledge
8 मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले.
 
Maga paramēśvara dēvānē pūrvēkaḍē ēdēna nāvācyā jāgēta ēka bāga lāvalī āṇi tyā bāgēta āpaṇa ghaḍavilēlyā manuṣyālā ṭhēvalē.
9 परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली.
 
Paramēśvara dēvānē sudanra disaṇārī annāsāṭhī uttama aśī sarva jātīcī jhāḍē bāgēmadhyē ugavalī āṇi bāgēcyā madhyabhāgī jīvanācē jhāḍa āṇi baṟyāvā'īṭācē jñāna dēṇārē jhāḍa aśī jhāḍē lāvalī.
10 एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या.
 
Ēdēna bāgēta ēka nadī ugama pāvalī va tinē sarva bāgēlā pāṇī puravalē. Nantara tī nadī vibhāgūna ticyā cāra vēgaḷayā nadyā jhālyā.
11 पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते
 
Pahilyā nadicē nāva pīśōna hōtē. Hī sarva havīlā dēśālā vēḍhā ghālūna vāhātē
12 त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात
 
Tyā dēśāta cāṅgalyā pratīcē sōnē sāmpaḍatē. Tēthē mōtī va gōmēda hī ratnē sāpaḍatāta
13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते.
 
Dusaṟyā nadīcē nāva gīhōna āhē, hī sagaḷyā kūśa mhaṇajē ithi'ōpiyā dēśābhōvatī vāhatē.
14 तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे.
 
Tisaṟyā nadicē nāva hiddakēla. Hī aśśūra mhaṇajē asīriyā dēśācyā pūrvēsa vahāta jātē. Cauthyā nadīcē nāva pharāta mhaṇajē yuphrēṭīsa asē āhē.
15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले.
 
Paramēśvara dēvānē manuṣyālā ēdēna bāgēta ticī maśāgata karaṇyāsāṭhī va bāgēcī kāḷajī ghēṇyāsāṭhī ṭhēvalē.
16 परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो.
 
Paramēśvarānē manuṣyālā hī ājñā dilī; paramēśvara mhaṇālā, “bāgētīla kōṇatyāhī jhāḍācē phaḷa tū khuśāla khā'ū śakatō.
17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”
 
Parantu baṟyāvā'īṭācē jñāna karuna dēṇāṟyā jhāḍācē phuḷa tū khā'ū nakō; jara tyā jhāḍācē phaḷa tū khāśīla tara tū nakkī maraśīla.”
The First Woman - Eve
18 नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.”
 
Nantara paramēśvara bōlalā, “manuṣyānē ēkaṭē asāvē hē barē nāhī; mī tyācyāsāṭhī yōgya madatanīsa nirmāṇa karīna.”
19 परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली.
 
Paramēśvarānē mātītūna śētātīla sarva jātīcē prāṇī āṇi ākāśātīla sarvajātīcē pakṣī utpanna kēlē āṇi tyānnā manuṣyākaḍē nēlē āṇi manuṣyānē mhaṇajē ādāmānē tyā sarvānnā nāvē dilī.
20 आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही.
 
Ādāmānē sarva pāḷīva prāṇī, ākāśātīla sarvapakṣī āṇi sarva vanapaśū mhaṇajē jaṅgalātīla, rānāvanātīla janāvarē yānnā nāvē dilī. Ādāmānē hē sarva paśū - pakṣī pāhilē parantu tyālā tyān̄cyāta āpaṇāsāṭhī yōgya asā madatanīsa sāpaḍalā nāhī.
21 तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.
 
Tēvhā paramēśvara dēvānē ādāmālā gāḍha jhōpa lāgū dilī. Āṇi tō jhōpalā asatā paramēśvarānē ādāmācyā śarīrātūna ēka phāsaḷī kāḍhalī va tī jāgā camaḍacānē banda kēlī. Tēvhā tī mānsānē bharuna ālī.
22 परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले.
 
Paramēśvarānē ādāmācī phāsaḷī kāḍhūna ticī strī banavalī āṇi tilā ādāmākaḍē nēlē.
23 2तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
 
2Tēvhā ādāma mhaṇālā, “ātā hī mātra mājhyāsārakhī āhē. Ticī hāḍē mājhyā hāḍā pāsūna va ticē śarīra mājhyā śarīrāpāsūna banavalē āhē. Mī tilā strī mhaṇajē nārī asē nāva dētō. Kāraṇa tī narāpāsūna banavalēlī āhē.”
24 म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
 
Mhaṇūna manuṣya āpalyā ā'ībāpānsa sōḍūna āpalyā bāyakōlā jaḍūna rāhīla āṇi tē dōghē ēka dēha hōtīla.
Naked - Not Ashamed
25 एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
 
Ēdēna bāgēta ādāma va tyācī bāyakō hī dōghē nagna hōtī. Parantu tyānnā kasalīca lāja vāṭata navhatī.

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.