PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.13.1

अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला.
 
Aśā rītīnē abrāmānē misara dēśa sōḍalā va tō āpalī bāyakō sārāya, putaṇyā lōṭa āṇi tyān̄cī sarva mālamattā ghē'ūna nēgēba madhūna pravāsa karīta gēlā.

उत्पत्ति 13
उत्पत्ति 13:1-9

Abram and Lot Part Ways

1 अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला व तो आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि त्यांची सर्व मालमत्ता घेऊन नेगेब मधून प्रवास करीत गेला.
 
Aśā rītīnē abrāmānē misara dēśa sōḍalā va tō āpalī bāyakō sārāya, putaṇyā lōṭa āṇi tyān̄cī sarva mālamattā ghē'ūna nēgēba madhūna pravāsa karīta gēlā.
2 त्या काळी अब्राम फार श्रीमंत झाला होता; त्याच्याजवळ पुष्कळ गुरेढोरे, शेरेडेमेंढरे, गाढवे व उंट तसेच सोने चांदी इत्यादी भरपूर होते.
 
Tyā kāḷī abrāma phāra śrīmanta jhālā hōtā; tyācyājavaḷa puṣkaḷa gurēḍhōrē, śērēḍēmēṇḍharē, gāḍhavē va uṇṭa tasēca sōnē cāndī ityādī bharapūra hōtē.
3 अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले व तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल व आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता व
 
Abrāma ikaḍētikaḍē satata pravāsa karīta rāhilā; tyānē nēgēba sōḍalē va tō punhā māgē bēthēlalā gēlā; bēthēla va āya yān̄cyā daramyāna yāca ṭhikāṇī tyānē tyācyā kuṭumbāsaha taḷa dilā hōtā va
4 परमेश्वराची उपासना करण्याकरिता त्याने एक वेदी बांधली होती, म्हणून त्याच ठिकाणी अब्रामाने परमेश्वराची उपासना केली. अब्राम व लोट वेगळे होतात
 
Paramēśvarācī upāsanā karaṇyākaritā tyānē ēka vēdī bāndhalī hōtī, mhaṇūna tyāca ṭhikāṇī abrāmānē paramēśvarācī upāsanā kēlī. Abrāma va lōṭa vēgaḷē hōtāta
5 या काळात लोट अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. लोट याजकडे खूप, गुरेढोरे व तंबू होते
 
Yā kāḷāta lōṭa abrāmābarōbara pravāsa karīta hōtā. Lōṭa yājakaḍē khūpa, gurēḍhōrē va tambū hōtē
6 अब्राम व लोट यांची गुरेढोरे इतकी वाढली की त्या दोघांना एकत्र राहाण्यास ती जागा व तो प्रदेश पुरेना,
 
Abrāma va lōṭa yān̄cī gurēḍhōrē itakī vāḍhalī kī tyā dōghānnā ēkatra rāhāṇyāsa tī jāgā va tō pradēśa purēnā,
7 शिवाय अब्राम व लोट यांच्या गुराख्यांची एकसारखी भांडणे होऊ लागली; त्याकाळी त्या देशात कनानी व परिज्जी लोकांची वस्ती होती.
 
Śivāya abrāma va lōṭa yān̄cyā gurākhyān̄cī ēkasārakhī bhāṇḍaṇē hō'ū lāgalī; tyākāḷī tyā dēśāta kanānī va parijjī lōkān̄cī vastī hōtī.
8 तेव्हा अब्राम लोटास म्हणाला, “तुझ्या माझ्यामध्ये तसेच तुझे व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडणतंटा नसावा, कारण आपण सगळे भाऊबंद आहोत.
 
Tēvhā abrāma lōṭāsa mhaṇālā, “tujhyā mājhyāmadhyē tasēca tujhē va mājhē gurākhī yān̄cyāmadhyē bhāṇḍaṇataṇṭā nasāvā, kāraṇa āpaṇa sagaḷē bhā'ūbanda āhōta.
9 तेव्हा आपण वेगळे व्हावे हे आपल्यासाठी बरे आहे तुला पाहिजे तो प्रदेश तू निवड; तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
 
Tēvhā āpaṇa vēgaḷē vhāvē hē āpalyāsāṭhī barē āhē tulā pāhijē tō pradēśa tū nivaḍa; tū jara ḍāvīkaḍē gēlāsa tara mī ujavīkaḍē jā'īna, āṇi tū jara ujavīkaḍē gēlāsa tara mī ḍāvīkaḍē jā'īna.”

Lot Proceeds toward Sodom

10 लोटाने यार्देन दरीकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले (परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश केला त्याच्या आधीची ही घटना आहे. त्यावेळी थेट सोअरापर्यंत पसरलेले यार्देन नदीचे खोरे परमेश्वराच्या बागे सारखे सुंदर होते मिसर मधील प्रदेशाप्रमाणे ही भूमी चांगली होती.)
 
Lōṭānē yārdēna darīkaḍē najara ṭākalī tēvhā tēthē sarvatra bharapūra pāṇī asalyācē tyālā disalē (paramēśvarānē sadōma va gamōrā yā nagarān̄cā nāśa kēlā tyācyā ādhīcī hī ghaṭanā āhē. Tyāvēḷī thēṭa sō'arāparyanta pasaralēlē yārdēna nadīcē khōrē paramēśvarācyā bāgē sārakhē sundara hōtē misara madhīla pradēśāpramāṇē hī bhūmī cāṅgalī hōtī.)
11 तेव्हा लोटाने यार्देन नदीच्या खोऱ्यात राहाणे निवडले; मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरवात केली;
 
Tēvhā lōṭānē yārdēna nadīcyā khōṟyāta rāhāṇē nivaḍalē; maga tē dōghē vēgaḷē jhālē āṇi lōṭānē pūrvēkaḍē pravāsa karaṇyāsa suravāta kēlī;
12 अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या तळवटीतील शहरातून राहिला; लोट दक्षिणेकडे दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तबू ठोकला.
 
Abrāma kanāna dēśātaca rāhilā āṇi lōṭa yārdēnēcyā taḷavaṭītīla śaharātūna rāhilā; lōṭa dakṣiṇēkaḍē dūra sadōmālā gēlā āṇi tēthēca tyānē āpalā tabū ṭhōkalā.
13 सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट व वाईट असल्याचे परमेश्वराला माहित होते.
 
Sadōma nagarācē lōka atiśaya duṣṭa va vā'īṭa asalyācē paramēśvarālā māhita hōtē.

God Renews the Promise to Abram

14 लोट निघून गेल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुझ्या अवतीभोवती, उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दूरवर नजर टाकून पाहा;
 
Lōṭa nighūna gēlyāvara paramēśvara abrāmālā mhaṇālā, “tujhyā avatībhōvatī, uttarēkaḍē va dakṣiṇēkaḍē, pūrvēkaḍē va paścimēkaḍē dūravara najara ṭākūna pāhā;
15 तू पाहातोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.
 
Tū pāhātōsa hā sagaḷā pradēśa mī tulā āṇi tujhyānantara tujhyā santatīlā kāyamacā dē'īna.
16 मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणाइतकी करीन, ती इतकी करीन की जर कोणाला ते कण मोजता येतील तर तुझ्या संततीचीही गणना होईल.
 
Mī tujhī santatī yā pr̥thvīvarīla dhuḷīcyā kaṇā'itakī karīna, tī itakī karīna kī jara kōṇālā tē kaṇa mōjatā yētīla tara tujhyā santatīcīhī gaṇanā hō'īla.
17 तर उठून जा व या तुझ्या प्रदेशातून फिरुन ये; हा सर्व प्रदेश मी आता तुला देत आहे.”
 
Tara uṭhūna jā va yā tujhyā pradēśātūna phiruna yē; hā sarva pradēśa mī ātā tulā dēta āhē.”
18 तेव्हा अब्रामाने आपले तंबू हलविले व हेब्रोन शहरजवळील मम्रेच्या मोठया वृक्षांत तो राहावयास गेला; परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.
 
Tēvhā abrāmānē āpalē tambū halavilē va hēbrōna śaharajavaḷīla mamrēcyā mōṭhayā vr̥kṣānta tō rāhāvayāsa gēlā; paramēśvarācī upāsanā karaṇyāsāṭhī tyānē tēthē vēdī bāndhilī.

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.