PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.12.1

परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
 
Paramēśvara abrāmālā mhaṇālā, “tū āpalā dēśa, āpalē gaṇagōta va āpalyā bāpācē ghara sōḍa; āṇi mī dākhavīna tyā dēśāta jā.

उत्पत्ति 12
उत्पत्ति 12:1-9

The Call of Abram

1 परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा.
 
Paramēśvara abrāmālā mhaṇālā, “tū āpalā dēśa, āpalē gaṇagōta va āpalyā bāpācē ghara sōḍa; āṇi mī dākhavīna tyā dēśāta jā.
2 मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील,
 
Mī tulā āśīrvāda dē'īna; tūjhyā pāsūna mōṭhē rāṣṭra nirmāṇa karīna; mī tujhē nāva mōṭhē karīna, lōka tujhyā nāvānē itarānnā āśīrvāda dētīla,
3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे लोक तुला शाप देतील त्यानां मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.”
 
Jē lōka tulā āśīrvāda dētīla tyānnā mī āśīrvāda dē'īna, āṇi jē lōka tulā śāpa dētīla tyānāṁ mī śāpa dē'īna. Tujhyāmuḷē pr̥thvīvarīla sarvalōka āśīrvādita hōtīla.”
4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता.
 
Tēvhā abrāmānē paramēśvarācī ājñā mānalī. Tyānē hārāna sōḍalē lōṭa tyācyā barōbara gēlā. Yā vēḷī abrāma pan̄cyāhattara varṣān̄cā hōtā.
5 हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला.
 
Hārāna sōḍatānā tō ēkaṭā navhatā tara tyānē āpalī bāyakō sārāya, putaṇyā lōṭa āṇi hārānamadhyē tyānnī miḷavalēlī mālamattā tasēca gulāma yā sarvānnā barōbara ghē'ūna tyānē hārāna sōḍalē va tō kanāna dēśācyā pravāsāsa nighālā āṇi kanāna dēśāta ālā.
6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावला आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
 
Abrāma kanāna dēśātūna pravāsa karīta śakhēma gāvalā ālā āṇi mōrēcyā mōṭhyā vr̥kṣāmparyanta gēlā. Yākāḷī tyā dēśāta kanānī lōka rāhāta hōtē.
7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशाजांना देईन.” ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली.
 
Paramēśvara abrāmāsa darśana dē'ūna mhaṇālā, “hā dēśa mī tujhyā vanśājānnā dē'īna.” Jyā jāgēvara paramēśvarānē abrāmālā darśana dilē tyā jāgī tyānē paramēśvarācī upāsanā karaṇyāsāṭhī ēka vēdī bāndhalī.
8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहोंचला व त्याने तेथे तळ दिला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि देवाची उपासना केली.
 
Maga abrāma tēthūna nighālā āṇi pravāsa karīta tō bēthēlacyā pūrvēsa ḍōṅgarāḷa bhāgāta pōhōn̄calā va tyānē tēthē taḷa dilā; tēthūna bēthēla paścimēsa hōtē āṇi āya śahara pūrvēsa hōtē; tēthē tyānē paramēśvarāsāṭhī dusarī vēdī bāndhalī āṇi dēvācī upāsanā kēlī.
9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेबकडे गेला.
 
Tyānantara abrāma punhā puḍhacyā pravāsāsa nighālā va nēgēbakaḍē gēlā.

Abram and Sarai in Egypt

10 त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला; तेथे पाऊस पडला नाही आणि अन्नधान्य उगवले नाही. म्हणून अब्राम मिसरमध्ये राहाण्यास गेला.
 
Tyā kāḷī tyā pradēśāta mōṭhā duṣkāḷa paḍalā; tēthē pā'ūsa paḍalā nāhī āṇi annadhān'ya ugavalē nāhī. Mhaṇūna abrāma misaramadhyē rāhāṇyāsa gēlā.
11 आपली बायको साराय फार सुंदर आहे असे अब्रामाने पाहिले; तेव्हा मिसर देशाच्या हद्दीत शिरण्यापूवी अब्राम साराय हिला म्हणाला, “मला माहीत आहे की तू अतिशय सुंदर व रुपवान स्त्री आहेस,
 
Āpalī bāyakō sārāya phāra sundara āhē asē abrāmānē pāhilē; tēvhā misara dēśācyā haddīta śiraṇyāpūvī abrāma sārāya hilā mhaṇālā, “malā māhīta āhē kī tū atiśaya sundara va rupavāna strī āhēsa,
12 म्हणून मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील ‘ही त्याची बायको आहे.’ आणि मग तुझ्या साठी ते मला मारुन टाकतील;
 
Mhaṇūna misaracē lōka jēvhā tulā pāhatīla tēvhā tē mhaṇatīla ‘hī tyācī bāyakō āhē.’ Āṇi maga tujhyā sāṭhī tē malā māruna ṭākatīla;
13 तर तू माझी बहीण आहेस असे तू लोकांस सांग म्हणजे मग ते मला मारणार नाहींत; ते माझ्यावर दया करतील; अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.”
 
Tara tū mājhī bahīṇa āhēsa asē tū lōkānsa sāṅga mhaṇajē maga tē malā māraṇāra nāhīnta; tē mājhyāvara dayā karatīla; aśā rītīnē tū mājhā jīva vācavaśīla.”
14 मग अब्राम मिसर देशात गेला; तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे.
 
Maga abrāma misara dēśāta gēlā; tēthīla lōkānnī pāhilē kī sārāya hī phāra sundara strī āhē.
15 मिसरच्या राजवाड्यातील सरदारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्या जवळ तिच्या सौंदर्याची वाखाणणी केली; आणि त्यांनी तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले.
 
Misaracyā rājavāḍyātīla saradārānnī sārāyalā pāhilē va tyānnī āpalā rājā phārō yācyā javaḷa ticyā saundaryācī vākhāṇaṇī kēlī; āṇi tyānnī tilā rājācyā gharī nē'ūna ṭhēvalē.
16 अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याजवर दया केली व त्याला मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले.
 
Abrāma sārāyacā bhā'ū āhē asē samajalyāvara phārō rājānē tyājavara dayā kēlī va tyālā mēṇḍharē, gurēḍhōrē, va gāḍhavē dilī tasēca abrāmālā dāsa, dāsī va uṇṭahī miḷālē.
17 अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकाना भयंकर रोगाची पीडा भोगावयास लावली.
 
Abrāmācī bāyakō sārāya hilā phārōnē nēlē mhaṇūna paramēśvarānē phārō va tyācyā gharātīla lōkānā bhayaṅkara rōgācī pīḍā bhōgāvayāsa lāvalī.
18 तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला. “तू माझ्याबाबत फार वाईट गोष्ट केलीस, साराय तुझी बायको आहे, हे तू मला सांगितले नाहीस का?
 
Tēvhā phārōnē abrāmāsa bōlāvalē. Tō mhaṇālā. “Tū mājhyābābata phāra vā'īṭa gōṣṭa kēlīsa, sārāya tujhī bāyakō āhē, hē tū malā sāṅgitalē nāhīsa kā?
19 ‘ती माझी बहीण आहे’ असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो; तिला घे व येथून निघून जा.”
 
‘Tī mājhī bahīṇa āhē’ asē tū kā mhaṇālāsa? Malā bāyakō karaṇyāsāṭhī mī tilā nēlē hōtē parantu mī ātā tujhī bāyakō tulā parata karatō; tilā ghē va yēthūna nighūna jā.”
20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या सरदारांना आज्ञा दिली; तेव्हा अब्राम व त्याची बायको साराय यांनी आपले सर्व काही बरोबर घेऊन मिसर सोडले.
 
Maga abrāmācī misaramadhūna bāhēra ravānagī karāvī aśī phārōnē āpalyā saradārānnā ājñā dilī; tēvhā abrāma va tyācī bāyakō sārāya yānnī āpalē sarva kāhī barōbara ghē'ūna misara sōḍalē.

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.