PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.10.1

शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे: याफेथाचे वंशज
 
Śēma, hāma va yāphētha hmā nōhācyā tīna mulānnā jalapralayānantara puṣkaḷa mulagē jhālē; tyān̄cī vanśāvaḷa yēṇē pramāṇē: Yāphēthācē vanśaja

उत्पत्ति 10
उत्पत्ति 10:1-32

The Table of Nations

1 शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे: याफेथाचे वंशज
 
Śēma, hāma va yāphētha hmā nōhācyā tīna mulānnā jalapralayānantara puṣkaḷa mulagē jhālē; tyān̄cī vanśāvaḷa yēṇē pramāṇē: Yāphēthācē vanśaja
The Japhethites
2 याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
 
Yāphēthācē mulagē; gōmara, māgōga, mādaya, yāvāna, tubāla, mēśēkha va tīrāsa hē hōtē.
3 गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते.
 
Gōmaracē mulagē; āṣkanājha, rīpātha va tōgārmā, hē hōtē.
4 यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
 
Yāvānācē mulagē; alīśā, tārśīśa, kittīma va dōdānīma.
5 भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती.
 
Bhūmadhyāsamudracyā kināṟyācyā āsapāsa jī rāṣṭrē jhālī tī sarva yāphēthācyā santatīpāsūna hōtī; pratyēka mulālā svata:Cī jamīna hōtī hī sarva kuḷē vāḍhata gēlī va tyān̄cī vēgavēgaḷī rāṣṭrē jhālī. Pratyēka rāṣṭrācī bhāṣā vēgaḷī hōtī.
The Hamites
6 हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान
7 कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते.
 
Kuśācē mulagē: Sabā, havīlā, sābtā, rāmā, va sāvtakā; āṇi rāmācē mulagē śabā va dadāna hē hōtē.
8 कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता.
 
Kuśālā nimrōda nāvācā mulagā hōtā, tō pr̥thvīvara mahābalavāna va parākramī asā vīrapuruṣa hōtā.
9 तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे.
 
Tō paramēśvarāpuḍhē balavāna śikārī jhālā mhaṇūna itara māṇasān̄cī nimrōdāśī tulanā karuna “tō māṇūsa, paramēśvarāsamōra balavāna nimrōda śikāṟyāsārakhā āhē” asē mhaṇaṇyācī prathā āhē.
10 शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती.
 
Śināra prāntātīla bābēla, ēraka, akkāda va kālahanē hī nimrōdācyā rājyātīla suravātīcī śaharē hōtī.
11 तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली
 
Tēthūna tō aśśurālāhī gēlā va tēthē tyānē ninavē, rahōbōtha, īrakālaha va rēsana hī śaharē vasavalī
12 (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.)
 
(Rēsana hē śahara, ninavē va mōṭhē śahara kālaha yān̄cyā daramyāna āhē.)
13 मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम
 
Misrā'īma yālā lūda, anāmīna, lahākīma, nāptuhīma
14 पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले.
 
Pātrusa kāslūha va kaptōrī hē mulagē jhālē. Kāslūhapāsūna paliṣṭī lōka ālē.
15 कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे,
 
Kanānācā pahilā mulagā sīdōna hā hōtā; kanāna hā hēthacāhī bāpa hōtā. Kanānāpāsūna udayāsa ālēlī rāṣṭrē,
16 यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
 
Yabūsī, amōrī, girgāśī,
17 हिव्वी, आकर्ी, शीनी
 
Hivvī, ākarī, śīnī
18 अर्वादी, समारी व हमाथी ही होती. पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली.
 
Arvādī, samārī va hamāthī hī hōtī. Puḍhē kanānācī kuḷē jagācyā vēgavēgaḷyā bhāgāta pasaralī.
19 कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती.
 
Kanān'yān̄cī sīmā uttarē kaḍīla sīdōnāpāsūna dakṣiṇēkaḍīla garārāparyanta va paścimēkaḍīla gājāpāsūna tara pūrvēsa sadōma va gamōrā paryanta tasēca ādamā pāsūna va sabō'īma pāsūna va lēśāparyanta pasaralī hōtī.
20 ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली.
 
Hī sarva hāma yācī vanśajē hōtī; hayā sarva vanśajānnā svata:Cī bhāṣā va dēśa hōtē; tī sarva vēgavēgaḷī rāṣṭrē jhālī.
The Semites
21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता.
 
Śēma hā yāphēthācā vaḍīla bhā'ū hōtā. Ēbara hā śēma yān̄cā vanśaja hōtā. Tō ibrī lōkān̄cā muḷa puruṣa hōtā.
22 शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;
 
Śēma yācē mulagē; ēlāma, aśśūra, arpakṣada, lūda va arāma;
23 अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते;
 
Arāmācē mulagē: Ūsa, hūla, gētēra va maśa hē hōtē;
24 अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला:
 
Arpakṣadāsa śēlaha jhālā, śēlahāsa ēbara jhālā:
25 एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
 
Ēbara yāsa dōna mulagē jhālē; ēkācē nāva pēlēga hōtē. Pēlēga mhaṇajē vāṭaṇī; kāraṇa yācyāca hayātīta pr̥thvīcī vāṭaṇī jhālī; tyācyā bhāvācē nāva yaktāna hōtē.
26 यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
 
Yaktānāsa alamōdāda, śēlēpha, hasarmāvētha, yēraha,
27 हदोराम, ऊजाल, दिक्ला
28 ओबाल, अबीमाएल, शबा,
29 ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे;
 
Ōphīra, havīlā va yōbāba asē mulagē jhālē; hē sagaḷē yaktānācē mulagē;
30 ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते.
 
Tē mēśāpāsūna pūrvēkaṛīla ḍōṅgarāḷa bhāgāta rāhāta hōtē. Mēśā saphāracyā dēśākaḍē hōtē.
31 हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे.
 
Hē śēmācē vanśaja hōtē. Kuḷē, bhāṣā, dēśa va rāṣṭrē yāpramāṇē tyān̄cī vibhāgaṇī aśī āhē.
32 ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.
 
Hī nōhācyā mulān̄cī va tyān̄cyā vanśajān̄cī, piḍhyā va kuḷāprāṇē yādī āhē; tyān̄cyā rāṣṭrāmpramāṇē tī ākhalēlī āhē; jalapralayānantara tyān̄cī pr̥thvīvara vēgavēgaḷī rāṣṭrē jhālī.

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.