PepLamb's Audio Bible
Loading God's Word...
माझी कोकरं चार | योहान 21:15-17
Gen.1.1

देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.
 
Dēvānē ākāśa va pr̥thvī nirmāṇa kēlī.

उत्पत्ति 1
उत्पत्ति 1:1-31
उत्पत्ति 1:1-2

The Creation

Heaven and Earth
1 देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.
 
Dēvānē ākāśa va pr̥thvī nirmāṇa kēlī.
2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता
 
Suruvātīlā pr̥thvī pūrṇapaṇē rikāmī hōtī; pr̥thvīvara kāhīhī navhatē. Andhārānē jalāśaya jhākalēlē hōtē; āṇi dēvācā ātmā pāṇyāvara pākhara ghālīta hōtā
The First Day—Light
3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.
 
Nantara dēva bōlalā, “prakāśa hōvō” āṇi prakāśa camakū lāgalā.
4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला.
 
Dēvānē prakāśa pāhilā āṇi tyālā kaḷalē kī tō cāṅgalā āhē. Nantara dēvānē andhārāpāsūna prakāśa vēgaḷā kēlā.
5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.
 
Dēvānē prakāśālā “divasa” va andhārālā “rātra” aśī nāvē dilī. Sandhyākāḷa jhālī va nantara sakāḷa jhālī. Hā jhālā pahilā divasa.
The Second Day—Heaven
6 नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.”
 
Nantara dēva bōlalā, “jalānsa dubhāgaṇyākaritā jalān̄cyā madhyabhāgī antarāḷa hōvō.”
7 तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले.
 
Tēvhā dēvānē antarāḷa kēlē āṇi antarāḷāvaracyā va khālacyā jalānsa vēgaḷē kēlē.
8 देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस.
 
Dēvānē antarāḷāsa “ākāśa” asē nānva dilē. Sandhyākāḷa jhālī va nantara sakāḷa jhālī. Hā jhālā dusarā divasa.
The Third Day—Earth, Seas and Plants
9 नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले,
 
Nantara dēva bōlalā, “antarāḷākhālīla pāṇī ēkatra gōḷā hōvō va kōraḍī jamīna disūna yēvō.” Āṇi tasē ghaḍalē,
10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
 
Dēvānē kōraḍyā jaminīsa “bhūmi” āṇi ēkatra jhālēlyā jalasan̄cayāsa “samudra” aśī nāvē dilī. Āṇi dēvānē pāhilē kī hē cāṅgalē āhē.
11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले.
 
Maga dēva bōlalā, “gavata, bīja dēṇāṟyā vanaspatī āṇi phaḷē dēṇāṟyā vanaspatī pr̥thvīvara vāḍhōta. Phaḷajhāḍē biyā asalēlī phaḷē tayāra karatīla āṇi pratyēka vanaspatī āpalyā jātīcyāca biyā tayāra karīla aśā vanaspatī pr̥thvīvara vāḍhōta.” Āṇi tasē jhālē.
12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.
 
Gavata, āpāpalyā jātīcē bīja dēṇāṟyā vanaspatī āṇi āpāpalyā jātīcī phaḷē dēṇārī va tyā phaḷātaca āpāpalyā jātīcē bīja asaṇārī phaḷa jhāḍē bhūmīnē upajavilī. Dēvānē pāhilē kī hē cāṅgalē āhē.
13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस.
 
Sandhyākāḷa jhālī va nantara sakāḷa jhālī. Hā jhālā tisarā divasa.
The Fourth Day—Sun, Moon, and Stars
14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.
 
Maga dēva bōlalā “divasa va rātra hī vēgaḷī karaṇyāsāṭhī ākāśāta jyōti hōvōta va tyā viśēṣa cinhē, āṇi viśēṣa mēḷāvē, r̥tū, divasa, āṇi varṣē dākhaviṇāṟyā hōvōta.
15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले.
 
Pr̥thvīlā prakāśa dēṇyāsāṭhī ākāśāta tyā jyōti hōvōta.” Āṇi tasē jhālē.
16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले.
 
Dēvānē dōna mōṭhyā jyōti nirmāṇa kēlyā. Divasāvara sattā cālaviṇyāsāṭhī mōṭhī jyōti sūrya āṇi rātrīvara sattā cālaviṇyāsāṭhī lahāna jyōti, candra, āṇi tyānē tārēhī nirmāṇa kēlē.
17 [This verse may not be a part of this translation]
18 [This verse may not be a part of this translation]
19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौधा दिवस.
 
Sandhyākāḷa jhālī va nantara sakāḷa jhālī. Hā jhālā caudhā divasa.
The Fifth Day—Fish and Birds
20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत” -
 
Maga dēva bōlalā, “jalāmadhyē jīvajantūcē thavēcyā thavē utpanna hōvōta. Āṇi pr̥thvīvara ākāśāta pakṣī uḍōbāgaḍōta” -
21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळड्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
 
Samudrātīla pracaṇḍa jalacara mhaṇajē pāṇyāta phiraṇārē va anēka jātīcē va prakāracē jalaprāṇī dēvānē utpanna kēlē. Tasēca ākāśāta uḍaṇārē niranirāḷaḍyā jātīcē pakṣīhī dēvānē utpanna kēlē āṇi dēvānē pāhilē kī hē cāṅgalē āhē.
22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.”
 
Dēvānē tyānnā āśīrvāda dilā, “phaladrūpa vhā, vāḍhā, samudrātīla pāṇī vyāpūna va bharuna ṭākā āṇi pakṣī bahuguṇita hōvōta va pr̥thvī vyāpūna ṭākōta.”
23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस.
 
Sandhyākāḷa jhālī va nantara sakāḷa jhālī hā hōtā pācavā divasa.
The Sixth Day—Land Animals and Mankind
24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळड्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले.
 
Maga dēva bōlalā, “niranirāḷayā jātīcē paśū, mōṭhē prāṇī vēgavēgaḷaḍyā jātīcē sarapaṭaṇārē va rāṅgaṇārē lahāna prāṇī asē jīvadhārī prāṇī pr̥thvīvara utpanna hōvōta. Tē āpāpalyā jātīcē anēka prāṇī nirmāṇa karōta.” Āṇi tasē sarva jhālē.
25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
 
Asē dēvānē vanapaśū, pāḷīva janāvarē, sarapaṭata jāṇārē lahāna prāṇī va vēgavēgaḷayā jātīcē jīvadhārī prāṇī nirmāṇa kēlē. Āṇi dēvānē pāhilē kī hē cāṅgalē āhē.
26 मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.”
 
Maga dēva bōlalā, “āpaṇa āpalyā pratirūpācā āpalyā sārakhā manuṣya nirmāṇa karu; samudrātīla māsē, ākāśātīla pakṣī, sarva vanapaśū, mōṭhī janāvarē va jaminīvara sarapaṭaṇārē sarva lahāna prāṇī yān̄cyāvara tē sattā cālavitīla.”
27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
 
Tēvhā dēvānē āpalyā pratirupācā manuṣya nirmāṇa kēlā; dēvācē pratirupa asā tō nirmāṇa kēlā; nara va nārī aśī tī nirmāṇa kēlī.
28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
 
Dēvānē tyānnā āśīrvāda dilā; dēva tyānnā mhaṇālā, “phaladrūpa vhā, bahuguṇita vhā āṇi pr̥thvī vyāpūna ṭākā; tī āpalyā sattēkhālī āṇā; samudrātīla māsē, ākāśātīla pakṣī āṇi pr̥thvīvara phiraṇārā pratyēka sajīva prāṇī yānvara sattā cālavā.”
29 देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील.
 
Dēva mhaṇālā, “dhān'ya dēṇāṟyā sarva vanaspatī āṇi āpāpalyā phaḷāmadhyēca vr̥kṣācē bīja asalēlī sarva phaḷajhāḍē mī tumhānsa dilī āhēta. Hī tumhāṅkaritā anna hōtīla.
30 तसेच पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत.” आणि सर्व तसे झाले.
 
Tasēca pr̥thvīvarīla sarva paśū, ākāśātīla sarva pakṣī āṇi jaminīvara sarapaṭata jāṇārē sarva prāṇī yān̄cyākaritā anna mhaṇūna mī hiravyā vanaspatī dilyā āhēta.” Āṇi sarva tasē jhālē.
31 आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.
 
Āpaṇa kēlēlē sarvakāhī phāra cāṅgalē āhē asē dēvānē pāhilē. Sandhyākāḷa jhālī va nantara sakāḷa jhālī. Hā jhālā sahāvā divasa.
उत्पत्ति १:१ साठी चित्रणउत्पत्ति १:१ साठी चित्रण

परस्पर संदर्भ

या वचनासाठी परस्पर संदर्भ उपलब्ध नाहीत.